सुरक्षा रक्षकाचे विद्यार्थ्यांशी गैरवर्तन…अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर एस.टी.आगारात नादुरुस्त एस.टी.बसेस व चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थायचे शैक्षणिक नुकसान होत असून ११ रोजी कावपिंप्री येथील विद्यार्थ्यांचे १२ वि चे पेपर बुडाले व सुरक्षा रक्षकाने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याने अ.भा.वि.प. संघटनेने आगार प्रमुखांना निवेदन देऊन एस.टी. बसेस ची सुविधा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अंचाळे मुक्कामी बस खाली असताना देखील कावपिंप्री येथे बस न थांबवल्याने विद्यार्थ्यांचे ११ वि व १२ वि ची परीक्षा देता आली नाही तसेच हे विद्यार्थी अमळनेर आगारात आगार व्यवस्थापकांना तक्रार करावयास गेले असता सुरक्षा रक्षकाने धक्का बुक्की केली अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली तसेच बसस्थानकात स्वछता नसणे गाड्या अस्ताव्यस्त लागणे,फलक न लावणे आदी बाबत ही मागणी करण्यात येऊन शहर मंत्री अभिजित पाटील याने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान याबाबत चालक व वाहकाने गाडीत भरपूर प्रवासी नसल्याने गाडी थांबवणे शक्य नव्हते असे सांगितले.
त्याच प्रमाणे खोकरपाट बहादरवाडी येथे सकाळी साडे सहा वाजता येणारी बस बंद झाली असून वारंवार निवेदन देऊनही बस सुरू झाली नाही परिणामी शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आणि ८ तारखेपासून सकाळी साडे दहाला येणारी बस बंद झाल्याने विद्यार्थी दीड वाजेला शाळेत पोहचत असल्याने त्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.यामुळे खोकरपाट व बहादरवाडी बसेस सुरू करण्याची मागणी दिव्या पाटील किशोरी पाटील,दीक्षा पाटील, शेजल पाटील या विद्यार्थिनींनी केली आहे.
करणखेडा येथे मिनी बस जाते मात्र आगारातील चार पैकी तीन मिनी बस दुरुस्तीसाठी जळगावला वर्कशॉप मध्ये पाठविण्यात आल्याने तीही बंद झाली आहे उड्डाण पुलावरून मोठी बस जाऊ शकते मात्र चालकांना वळवायला त्रास होतो म्हणून चालक नकार देत असल्याचे समजते बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे.