अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार झाले होते त्यातील फरार आरोपी इम्रान बेलदार यालाही पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने तीन अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात रवाना केले आहे.
आमिन एजाज खाटीक वय २० रा. पिंपळे रोड व तीन अल्पवयीन मुले, राकेश वसंत चव्हाण, इम्रान शेख गुलाब बेलदार हे प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलाखाली दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत लोखंडी सुरा, लोखंडी पाते, बॅटरी, ५० ग्राम मिरची पूड, सुती दोरी, स्क्रू ड्रायव्हर, व दोन मोटरसायकली सह असतांना पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस नाईक किशोर पाटील, प्रमोद बागडे, विजय साळुंखे, रवी पाटील, योगेश पाटील, योगेश महाजन यांनी पकडले असता राकेश चव्हाण व इम्रान शेख फरार झाले होते चौघांना ताब्यात घेतले सर्व सहा आरोपींविरुद्ध भादवी ३९९, ४०२, व शस्र कायदा ४/२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे चौघांना न्यायाधीश चौखुंडे यांच्या न्यायालयात सादर केले असता तिघा अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात रवाना केले असून तपास सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.