अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहरातील एका विवाहित महिलेने पतीने संमतीशिवाय अनैसर्गिक संभोग केला व इतरांनी विनयभंग केला आणि जमीन घेण्यासाठी ३ लाख मागितल्याच्या कारणावरून सुरत उदनायार्ड मदनपुरा अंबिकानगर मधील एकूण ६ जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील एका ३२ वर्षीय महिलेचा विवाह दीपक शिवाजी पाटील याच्याशी झाला होता २६ एप्रिल २००७ च्या दोन वर्षांपासून जमीन घेण्यासाठी ३ लाख रुपये मागत होते त्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होते ५ सप्टेंबर रोजी महिलेने अमळनेर पोलिसात अर्ज केला की पती दीपक पाटील, सासू शकुंतलाबाई शिवाजी पाटील, सासरे शिवाजीराव पाटील, नणंद वैशाली रवींद्र पाटील, रेखाबाई विष्णू पाटील नंदोई रवींद्र सुकलाल पाटील यांनी शारीरिक मानसिक त्रास दिला सासरे व नंदोई यांनी विनयभंग केला आणि आमच्या घरात घरातील कोणत्याही व्यक्तीने स्त्रीशी संबंध ठेवण्याची परंपरा असल्याचे सांगून वेळोवेळी अन्याय केल्याचे तिने तक्रारीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच पतीनेही संमती शिवाय अनैसर्गिक संभोग केला.सदर अर्जाची चौकशी करून हेडकॉन्स्टेबल प्रभाकर पाटील यांनी सहा आरोपींविरुद्ध भादवी ३७७, ४९८, ३५४, ३२३, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि.गणेश चव्हाण हे करीत आहेत.