बांभोरी कॉलेज विजेता, तर प्रताप कॉलेज उपविजेता..अमलनेर(प्रतिनिधी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव अन्तर्गत एंरडोल क्रीड़ा विभाग द्वारा आयो- जित आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा प्रताप कॉलेजच्या क्रीडांगणात काल ११/१०/२०१८ रोजी संपन्न झाले.
या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्या डॉ. ज्योती राणे मॅडम यांनी केले.या प्रसंगी मा.जितेन्द्र जैन (कार्यपाध्यक्ष,खा.शी.मंडळ),प्रा.डॉ. ए. बी.जैन(चिटणीस),मा.योगेशजी मुंदडा संचालक,प्रदीप अग्रवाल(संचालक),मा.डॉ जयेशभाई गुजराथी (समन्वयक, आय.क्यु. ए.सी) हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी प्रा मनोहर पाटील(पाचोरा),प्रा संजयजी भावसार (पारोळा),प्रा देवदत्त पाटील(मारवड),प्रा जगदीश शिसोदीया (बांभोरी),प्रा शैलेश पाटील(अमलनेर),प्रा अमोल पाटील(चोपडा) हे सर्व क्रीड़ा संचालक सुद्धा उपस्थित होते.याच प्रमाणे वरिष्ट जिमखाना समिती सदस्य प्रा.आर सी सरवदे, प्रा.माधव भुसनर यांनीही सहभाग घेतला होता.
प्रस्तुत स्पर्धेचे पंच म्हणुन दिपक चौगुले,चेतन परदेशी,शंकर गोयकर,दिपक मद्रासी यांनी काम पाहिले.स्पर्धेच्या यशस्वीते करिता प्रा.अमृत अग्रवाल सर(जुनिअर क्रीड़ा संचालक),प्रा सचिन पाटील,बाळू भाऊ देवकते,प्रमोद गोयकर,धर्मेश मद्रासी, भुषण अहिरराव,जयेश मासरे आदीनी परिश्रम घेतले.या स्पर्धेचे सूत्र संचालन डॉ विजय तुन्टे(प्रमुख,जिमखाना विभाग) यांनी केले तर आभाराचे काम प्रा सचिन पाटील (क्रीड़ा संचालक) यांनी पार पाडले.