अमळनेर(प्रतिनिधी) येथील जि.एस.हायस्कूलमध्ये प्रताप शेठ यांची पुण्यतिथी तर सानेगुरुजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक डी. एच. ठाकूर, पर्यवेक्षक सी. एस. पाटील, ज्येष्ठ शिक्षक ए. डी. भदाणे, डी. एम. दाभाडे, सी. एस. सोनजे व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून अमळनेर नगरीचे आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक, कार्याचे महामेरू श्रीमंत प्रताप शेठ यांचे तसेच थोर लेखक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते परम पूजनीय सानेगुरुजी यांच्या कार्याचा लेखाजोखा आपल्या शब्दातून मांडला. याप्रसंगी पर्यवेक्षक सी.एस पाटील,परिविक्षाधीन शिक्षक राहुल काशिनाथ ब्रम्हे,अमर फारुख पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थी संघाचे प्रमुख एस.आर.अहिरे यांनी केले तर आभार एच.एस.चौधरी यांनी मानले.