धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोदामात नाशिकच्या पथकाने टाकली धाड
अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा शहरात धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गोदामात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या पथकाने धाड टाकून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उध्वस्त केला. असून १ कोटी ६४ हजार १६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अमळनेर तालुक्यातील एका आरोपीचा समावेश आहे.
राज्य उत्पन्न शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय उपयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक जितेंद्र गोगावले, ए.एस. चव्हाण, व्ही. एम. पाटील, अ. गो. सराफ, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड यांच्या पथकाने पारोळा येथील गट नंबर १,२ ,३ मध्ये छापा टाकला असता त्याठिकाणी देशी ,विदेशी बनावट दारू तयार करीत असताना काही लोक आढळून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्याठिकाणी ५ हजार लिटर स्पिरिट, १७०० लिटर अवैध देशी दारू द्रावण, ९ हजार ४३२ लिटर देशी बनावट मद्य, बनावट कागदी लेबल, २४ हजार २२० रिकाम्या बाटल्या, ८०० लिटर द्रावण , २४ प्लास्टिक ड्रम, आयशर एम एच १८ बी जी ९८२३ तसेच दहा चाकी ट्रक एम एच १८ एम ३८३७ असा एकूण १ कोटी ६४ हजार १३२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महेश संभाजी पाटील (रा. जवखेडे, ता. अमळनेर), सुदामगिर भुरागिर गोसावी (रा. भाटपुरा ता. शिरपूर, जि. धुळे), प्रेमसिंग रतन जाधव (रा. रोहिणी ता. शिरपूर, जि.धुळे) यांच्यावर कारवाई करण्यात आली.