अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जळोद येथील पाणी पुरवठा पंपावर विजेचा धक्का लागून अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना १० रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली.
नगरपरिषदेचे अभियंता शरद शंकर देसले हे १० रोजी दुपारी पावणे तीन वाजता जळोद पंपावर काम करत असताना विजेचा धक्का लागुन मृत्यू झाला.त्यांचे अमळनेर ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून सोमनाथ चांगदेव वंजारी यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहेत.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक ११/१०/२०१८ रोजी
सकाळी १० वाजता राहत्या घरापासून पांडुरंग देशमुख नगर (विद्या नगरच्या बाजूला) अमळनेर येथून निघणार आहे.