अमळनेर– नुकत्याच सोलापूर येथील राजीव गांधी इन्डोअर स्टेडियम येथे ओकीनावा मार्शल आर्ट्स अकेडमी इडीया च्या २२वी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा सम्पन्न झाली. त्यात अमळनेर येथील गंगाराम सखाराम हायस्कूल येथे सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला त्यात वेदांत संतोष बि-हाडे व कार्तिक धनावट यानी फाईट गटात आपले कौशल्य दाखवून प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल प्राप्त केले. तर लोकेश सुधाकर पाटील व पराग सयाजीराव पाटील यांनी दुसरा क्रमांक पटकावला व रौप्यपदक प्राप्त केले तसेच प्रशांत बाळू टिळगे,रोशन सुनील पाटील, पवन प्रविण लोहार, यशराज पाटील, कैलास पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकावून कास्य पदकांची कमाई केली. यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक कर्तव्य माळी व वेदांत बिऱ्हाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…