अमळनेर– राज्याची सध्याची शैक्षणिक स्थिती दर्जा सुधारण्यासाठी अध्ययन निष्पत्ती ७५ टक्के झाली पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी नाविन्याची कास धरावी आणि शाळा विद्यार्थ्यांसाठी तयार करावी असे आवाहन गणित विषयाचे राज्यस्तरीय सुलभक डी ए धनगर यांनी गणित शिक्षकांना उदबोधन प्रसंगी केले.
अमळनेर व पारोळा तालुक्यातील ५ वी ते १० वी ला गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा उद्बोधन वर्ग ग स शाळेत आयो- जित करण्यात आला होता शिक्षणातील अध्यापन पद्धतीत झालेला बदल शिक्षकांनी स्वीकारून माध्यमिक शाळेटील मुलांची गळती थांबवावी , प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता विकसित करणे,माध्यमिक शिक्षकाला अध्यापन करण्या साठी योग्य ती दिशा व आवश्यक ती मदत मिळावी ,शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करावे यासाठी शासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
उद्बोधन वर्गासाठी एम एस नेमाडे, परेश श्रावगी , पी एस नेमाडे , डी ए धनगर या राज्यस्तरीय सुलभकानी मार्गदर्शन केले उद्बोधन वर्गासाठी डी आय इ सी पी डी च्या अधिव्याख्याता सूचिता पाटील, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, विषय तज्ञ प्रमोद पुनवटकर , प्रमोद पाटील, किशोर ठाकरे , शिरसाठ आदींनी सहकार्य केले उद्बोधन वर्गास अमळनेर व पारोळा तालुक्यातील २०० शिक्षक हजर होते.
या वेळी मंगरुळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय पाटील यांनी बोलक्या भिंती केल्यानं विशेष सत्कार करण्यात आला.