मुडी-बोदर्डे-कळंबु रस्त्याचे काम मार्गी लावल्याने केले ग्रामस्थानी कौतुक…अमळनेर(प्रतिनिधी)पांझरा काठावर वसलेल्या कळंबु गावात नविन अत्याधुनिक ग्रामपंचायत तयार झाल्याने गावाचा कारभार देखील अत्याधुनिक होईल, अतिशय सुंदर अशी ही इमारत असून याची निगा देखील ग्रामस्थानी घेणे अपेक्षित आहे,अशी भावना आ शिरीष चौधरी यांनी कळंबु येथे ग्रा.प. इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली.तसेच गावासाठी सामाजिक सभागृह व कॉक्रीट रस्ता देण्याची ग्वाही दिली.
आ शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी मतदार संघातील अनेक गावांत नव्या आधुनिक ग्रा. प.च्या इमारती उभ्या झाल्या आहेत,कळंबु येथेही ग्रा प इमारत मंजूर होऊन तिचे काम पूर्णत्वास आल्याने आ चौधरींच्या हस्ते थाटात या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले,यावेळी ग्रा.प. पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने आमदारांचा जंगी सत्कार करण्यात आला.सुरुवातीला प्रास्तविकात रमेश चव्हाण यांनी अनेक वर्षापासून मुडी,कळंबु रस्त्याची मागणी होत असताना सर्व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले होते,परंतु आमदार चौधरी यांच्या प्रयत्नांनी मुडी-बोर्दडे ते कळंबू रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 1कोटी 20 लाख एवढ्या निधीतून तयार करण्यात आला असल्याचे सांगून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.शेवटी आमदार चौधरी यांनी गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी न.पा.चे गटनेते प्रवीण पाठक, किरण गोसावी, अनिल महाजन, बोर्दडे सरपंच संतोष चौधरी,कळंबु सरपंच लताबाई उदयसिंग राजपुत, उपसंरपच रामलाल चव्हाण, सदस्य मायाबाई भिल, सुनंदाबाई भील,नंदाबाई राजपुत, भगवान कोळी, रेखाबाई शिरसाठ,ताराबाई चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते पंकज राजपुत, जालीदंर पारधी, गणेश चव्हाण, गुलाब आगळे, हेमंत चौधरी, धनराज चौधरी,विकास राजपुत, गजेंद्र राजपुत, राजेद्र राजपुत, लोटनसिंग राजपूत, उदयसिंग राजपुत्र, देवीसिंग राजपूत, रमेश चव्हाण, भटु शिरसाठ, जयपाल राजपुत, मोतीलाल पारधी, देविसिंग राजपुत, रतिलाल भिल, मंगलसिंग राजपूत, भावेश राजपुत, बारकु भिल, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन रमेश चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन पंकज राजपूत यांनी मानले.