स्थानिक कार्यकर्त्यांच्या संमतीने या ठिकाणी उमेदवार ठरवला जाईल.अमळनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष मा.खासदार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्वाखाली काल शुक्रवारी दुपारी ३. ३० वा.अमळनेर शहरात पैलाड चोपडा नाका येथे जन-संघर्ष-यात्रेचे आगमन होताच ढोल ताशे फटाक्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
स्थानिक शेतककऱ्यांचे बैलगाडे कार्यकर्त्यांचे मोटर सायकली यात सहभागी झाले मोदी सरकार विरूद्ध चा एल्गार व कार्यकर्यां मध्ये जोश संचारला होता पैलाड हून फरशी पूलावर नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांच्या ढोल पथकाने स्वगत केले त्या नंतर सुभाष चौकात स्वागत करण्यात आले या ठिकाणी राष्ट्रवादी कॉ.चे नेते
अनिल भाईदास पाटील बाळू पाटील मूक्तार खाटीक विनोद कदम आदिंनी स्वागत केले.संवेदनाहीन सरकारपासून महागाईने सर्वसामान्य जनता होरपळली असल्याचे येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले की यापूर्वी ही जागा काँग्रेस कडे होती. मात्र मध्यंतरी विरोधक याठिकाणी आले. आता मात्र काँग्रेस सरकार आणण्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे. त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या संमतीने या ठिकाणी उमेदवार ठरवला जाईल.
देशातील वाढती-महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते भाव शेतक ऱ्यांवर अत्याचार रॉफेल विमान घोटाळा बँकांची लुट करून देशाचे तिजोरीवर होणारा हल्ला, भ्रष्टाचार आणि संविधानात बदलासह दलीत-मुस्लीमांवर देशभर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध रॅलीत घोषणा हातात फलक घेतलेले कार्यकर्ते सहभागी होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे राज्यभर जन-संघर्ष-मोर्चाद्वारे तीव्र आंदोलन व जनजागृती केली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद यात्रेस लाभला असून आता लोक काँग्रेसकडे वळत आहेत. सर्वसामान्य जनता महागाई, इंधनदरवाढ, पिकाला हमीभाव मिळत नाही. यामुळे जनता होरपळून निघाली आहे. मात्र सरकार संवेदनाहीन झाले आहे. असे सरकार प्रचंड ताकद लावून खाली खेचा. याविरोधात काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढून एल्गार पुकारलाय.
यावेळी वेळ कमी असल्याने आम्ही याठिकाणी सभा घेतली नाही.
येथील गलवाडे रस्त्यावरील अंबिका मंगल कार्यालयात यात्रेतील नेत्यांच्या भोजनाची सोय स्थानिक कार्यकर्त्यांनी वर्गणी जमा करून केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार हुसेन दलवाई, सचिन सावंत, रत्नाकर महाजन, माजी मंत्री नसीम खान, सत्यजित तांबे, आमदार शोभा बच्छाव, आमदार डॉ.हेमलता पाटील, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, संदीप पाटील, प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, नितेश पाटील, प्रकाश सोनवणे, डी.जी.पाटील, ग्रंथालय जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष-गोकुळआबा बोरसे,शहराध्यक्ष मनोज पाटील, प्रा.सुभाष पाटील, डॉ अनिल शिंदे अॅड रज्जाक शेख शांताराम पाटील सुलोचना वाघ धनगर पाटील संदिप पाटील शेखा मिस्तरी, नूतन पाटील, लताबाई बोरसे, भावना देसले, स्वाती साळुंखे, आशा शिंदे, पंचशीला संदानशिव, सुरेखा पाटील आदि सर्व कॉंग्रेस फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक शेतकरी कॉंग्रेसप्रेमी ऊपस्थित होते. सेवाग्राम येथून केंद्रातील मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर आता राज्यातील फडणवीस सरकारविरोधात काढण्यात येत असलेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ गुरूवारी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाला आहे. त्यानंतर यात्रा अमळनेर येथे शुक्रवारी दुपारी ३:३० वाजता दाखल झाली होती.
शुक्रवारी भोजन आटोपून ही यात्रा जळगावनंतर धुळे, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जनसंघर्ष यात्रा पोहचणार आहे.