खबरीलाल न्यूज पोर्टल ने महिना भरात अनेक विषयांवर भाष्य करीत, नवनवीन विषय मांडून लोकशाही शाबूत राहावी या साठी प्रयत्न केला,अनेकांना उघडे पाडले,सत्य जनते समोर आणले,खबरीलाल खरा पत्रकार म्हणून जनतेच्या पसंतीस पडला, खबरीलाल ने अनेक दडलेल्या बातम्यांना लोका समोर आणले. चोरून लपून काळे,गोरे कारणामे करणारे चेहरे खबरीलालने जनते समोर आणले,अत्यन्त कमी कालावधीत मिळालेले यश व वाचकांची मिळालेली दाद आमचा विश्वास वाढविणारी आहे.,आपल्या सदिच्छा मिळणारे लाईक्स व आपले आम्हास मिळणारे पाठबळ आठवणीत ठेऊन न्याय मिळवून देतांना सत्याचा वसा टाकणार नाही, केवळ एका महिन्याभरात ३२ हजार वाचकांनी आमच्या खबरीलाल वेबसाईट ला भेटी दिल्या व हे मिळालेले यश आमच्या वाचक रसिक बंधूंच्या चरणी अर्पण करीत आहोत, आपण विषय द्या, बातमी द्या, काही नवीन सुचवा, नेहमी स्वागत असेल त्या बरोबर खबरीलाल चा कॅमेरा त्या दिशेने वळवु व सत्य तेच आपल्या समोर मांडू हे या निमित्ताने निवेदन.
आपण खबरीलाल वर प्रेम करीत आहात याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद व ऋणात राहू इच्छितो.
सदैव सत्या सोबत!
आपला लाडका लाल खबरीलाल….