मारवड पोलिसात गुन्हा दाखल, माथेफिरूवर कारवाईची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथील शेतातील उभे बाजरीचे अपरिपक्व पीक गेल्या महिन्यापूर्वी माथेफिरूने कापून फेकून दिले होते. तर त्यानंतर दि.२४ रोजी त्याच शेतातील बाजरी व मक्काची कुट्टीला आग लावून जाळून टाकल्याचा प्रकार घडला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकासन झाले.
तालुक्यातील निम येथील डॉ. एल डी चौधरी यांनी त्यांच्या पशुधनासाठी शेतात कुट्टी तयार केली होती. या कुट्टीला मुद्दाम आग लावून नष्ट करण्याच्या प्रयत्न करण्यात आला असून यापूर्वीही याच शेतातील अपरिपकव बाजरीचे पीक कापून फेकून दिल्याची घटना घडली होती. मात्र पुन्हा अशी घटना घडल्याने याबाबत मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने माथेफिरूवर कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे. तर याप्रकरणी अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.