यात्रा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची दुचाकी लांबवली

अमळनेर (प्रतिनिधी) यात्रा पाहण्यासाठी आलेल्या आमोदे येथील भाविकांची दुचाकी लांबवल्याची घटना १८ रोजी घडली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील आमोदे येथील धीरज विलास पाटील हा १८ रोजी रात्री १० वाजता मित्रांसोबत बोरी नदीत यात्रेत आले होते. त्यांनी त्यांची मोटरसायकल (क्रमांक एम एच १९बी डब्ल्यू ७६७८) ही पार्किंग मध्ये लावली होती. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास मोटरसायकल गायब झाली होती. अज्ञात चोरट्याने ३० हजार रुपयांची मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील महाजन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *