पातोंडा येथे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथे माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर झाले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे आयोजन महेंद्र पाटील व शितल पाटिल मा. सरपंच यांनी केले होते. याप्रसंगी पातोंडा परिसरातील तरुणांनी रक्तदान करून त्यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्याची प्रार्थना केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार स्मिता वाघ होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बी. एस. पाटील, प्रदेश सरचिटणीस भैरवी पलांडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, मा. जि.प सदस्य व्ही. आर. पाटील, मा. सभापती श्याम अहिरे, मा.जि.प. सदस्य विनायक बिरारी,तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, जिजाब नाना, संदीप पाटील, दिलीप पाटील, उपसरपंच नितीन पारधी, किशोर पाटील,घनश्याम पाटील,यांच्यासह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण बिरारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *