देसले यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन पत्र पाठवत केले विशेष कौतुक
अमळनेर (प्रतिनिधी ) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तालुक्यातील दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सुषमा देसले यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन विशेष कौतुक केले आहे. त्यांना १२ मे रोजी राज्यपाल कोश्यारी यांनी विशेष पत्र पाठवले आहे. त्यामुळे त्यांना राज्यपालांच्या कौतुकाच्या थापमुळे अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.
कोरोना संसर्ग काळात सरपंच सुषमा देसले यांनी गावसह परिसरातील लोकांसाठी उपयुक्त उपाययोजना करून त्यांना सुरक्षित ठेवण्याचे काम निष्ठेने केले आहे. तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने महावृक्षारोपण अभियान यशस्वी करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या समाजकार्याला राज्यपालांनी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.