सारबेटे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ; निगरगठ्ठ ग्रामसेवकावर होणार कारवाई…?

दूषित पाण्याची विहीर पाहतांना गटविकास अधिकारी सह ग्रामस्थ.

सारबेटे (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सारखेटे खुर्द येथील गावकऱ्यांच्या तक्रारीवरून
गावातील पाणीपुरवठा विहिरींची तपासणी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केली असता प्रथमदर्शनी पाणी दूषित हिरवेगार आढळून आले.
यासह इतर कारणावरून ग्रामसेवकास दोन दिवसात निलंबित करणार असल्याचे अमळनेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सागितले.
सारबेटे खुर्द येथे दूषित पाणी पुरवठा होत असून लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.सरपंच व ग्रामसेवक दिनेश बागुल हे दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानुसार गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी गावातील तिन्ही विहिरींची तपासणी केली.तेव्हा त्यांना प्रथमदर्शनी पाणी दुषीत आढळून आले. सुमारे १५ दिवसापासून विहिरीत टी.सी.एल.पावडर टाकलेले नसल्याचे दिसून आले. तात्काळ विहिरीत टी.सी.एल पावडर टाकण्याच्या सूचना ग्रामसेवकास देण्यात आल्या.दरम्यान,वसुली नसल्याने विज कनेक्शन कापले गेल्याचे ही चौकशीत निदर्शनास आले. याबाबत ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना तात्काळ दप्तर तपासणीचे आदेश दिले आणि दोष आढळल्यास  ग्रामसेवकासह  ग्रामपंचायत कार्यकारणीवर कारवाई करण्यात येईल. ग्रामसेवक दिनेश बागुल सतत गैरहजर राहत असून घरकुल बाबतही अनियमितता आहे त्यामुळे दोन दिवसात ग्रामसेवकास निलंबित करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी चौकशीच्या वेळी श्रावण वंजारी,मनोहर पाटील, संदीप पाटील,महेश पाटील,प्रवीण भिल,निर्मलाबाई भिल,आदी हजर राहून यांच्या समोर गावातील तिन्ही विहिरींचे पाणी नमुने तपासणी करीता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच गटविकास अधिकारी यांना गावकऱ्यांकडून निवेदन ही देण्यात आले. निवेदनावर नागरिकांच्या सह्या होत्या. यावेळी शोभाबाई ब्रम्हे,सुनंदा ब्रह्मे, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर भिल, देवकाबाई भिल, बापू बोराडी, मंगलाबाई कुंभार,रजू पाटील, कल्पना कुंभार, भास्कर अहिरे, आनुबाई मांग, दसरत भिल, राजेंद्र भिल, रवींद्र सावळे, शोभाबाई सपकाळे, कपिल ब्रह्मे, राकेश ब्रह्मे, पंकज कुंभार, सुरेश भिल,सह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *