लग्न जमत नसल्याने दारूच्या व्यसनात तरुणाची आत्महत्या

अमळनेर (प्रतिनिधी) लग्न जमत नसल्याने दारूच्या व्यसनात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसाळे येथे घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील रमेश बुधा पाटील (वय ३२) याने १० रोजी पहाटे लग्न जमत नसल्याने दारूच्या व्यसनात खुंटीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दगडू लाला पाटील याने माहिती दिल्याबरून मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल भरत गायकवाड करीत आहेत