जळोद येथील एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसानी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील जळोद येथील नितीन मोतीलाल चौधरी (वय ३९) याने ९ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास छताच्या सऱ्याला सुती दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.