अमळनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत कार्यशाळा
अमळनेर (प्रतिनिधी) तालुका कृषी कार्यालयातर्फे आत्मनिर्भर भारत अभियान योजनेंतर्गत तालुकास्तरीय प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना बाबत कार्यशाळा घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजन केले होते.
तालुका कृषी अधिकारी भरत वारे, मंडळ कृषी अधिकारी दीपक साळुंखे, प्रदीप निकम, मयूर कचरे, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक, महिला बचत गटांच्या अध्यक्ष, महिला शेतकरी उपस्थित होते.

या वेळी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. “प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्यअन्नप्रक्रिया” योजना व प्रेरणादायी अशा पद्मश्री भुषण रायाबई फोफरे यांच्या कार्याचा आलेख गाथा सांगुन महिलांना महिलादिनी प्रेरणा दिली. दीपक साळुंखे यांनी पीएमएफएमई उद्योग योजनेबद्दल कोण व किती गट लाभार्थी होऊ शकता ही सविस्तर माहिती सांगितली. महिलांना, महिला बचत गट प्रतिनिधी प्रमुख तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या राज्य अध्यक्षा प्रा. रंजना देशमुख कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून होत्या. या वेळी प्रा. रंजना देशमुख यांनी प्रथम बचत गटाविषयी महिती दिली. यावेळी सरपंच निंभोरा पायल पाटील तसेच तालुक्यातील महिला बचत गट अध्यक्षा प्रतिनिधी व इतर शेतकरी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी साळुंखे यांनी पीएमएफएमई, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, महाडीबीटी व इतर योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच योगिता लांडगे कृषि सहायक यांनी सूत्रसंचालन केले.