चोरट्यांनी खळ्यात बांधलेल्या ३७ हजारांची ३ गायी चोरल्या

अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी खळ्यात बांधलेल्या ३७ हजार रुपये किमतीच्या तीन गायी चोरून नेल्याची घटना ९ रोजी रात्री तालुक्यातील खवशी येथील दहिवद नांद्री रस्त्यावर घडली. याप्रकरणी पशुधन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रशेखर अशोक पाटील (रा. दहिवद) यांच्या मालकीच्या खवशी येथील पाण्याच्या टाकीजवळील खळ्यातून ३७ हजार रुपये किमतीच्या तीन गायी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. अमळनेर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.