क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे योगध्यान मार्गदर्शन शिबिर
अमळनेर (प्रतिनिधी) क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे ८ मार्च रोजी “जागतिक महिला दिनाच्या निमित्त योगध्यान मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
क्षत्रिय काच माळी समाज मढी येथे शिबिर झाले. शिबीराची सुरुवात ज्ञान ज्योती सावित्रीमाईच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. योग शिक्षिका दिपाली राहुल महाजन यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तान-तणावमुक्त जिवनासाठी नियमित योग-ध्यान आवश्यक असुन महिलानी आपल्या दिनचर्येतुन योगासाठी वेळ दिला पाहिजे. त्यांनी महिलांकडून योग प्रात्यक्षिके करुन घेतली. योग मार्गदर्शन शिबिरात महिलाची उपस्थिती लक्षणिय होती. शिबीर यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
