अमळनेर– सैराट चित्रपटाने अख्ख्या तरुणाईला वेड लावलं होतं. विशेष म्हणजे आज या चित्रपटाला येऊन बरेच दिवस झाले तरी, त्याची तरुणांमध्ये असलेली क्रेझ अजूनही संपलेली दिसत नाही. सैराटचे अनुकरण करत आजपर्यंत अनेक जोडपी घरून पळून गेली. त्यापैकी काहींचा जीवनाचा सैराटच्या शेवट सारखाच शेवट झाला. सैराटच्या कथानकाला शोभेल अशीच कथा अमळनेर तालुक्यातील चौबारी गावात घडल्याचे बोलले जात आहे. मात्र या कथेचा शेवटही सैराटच्या शेवटसारखाच झाला की काय अशी ही शंका जनमाणसात व्यक्त केली जात आहे.
चौबारीतील एक तरुण शिक्षण घेत असतानाच एका मुलीवर प्रेम करु लागला. खरे तर तिचेही त्याच्यावर प्रेड जडले होते. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करु लागले. मात्र प्रेम बहरत असताना मुलीच्या आईवडिलांनी तिचे लग्न करायचे ठरविले. त्याचवेळी मुलगी आईवडिलांना त्या मुलावर असलेलं प्रेम जाहीर करु शकली नाही. म्हणजेच हिंमत करुन सांगू शकली नाही. नाईलाजास्तव तिला आईवडिलांच्या मर्जीने लग्न करावे लागले. लग्न होऊन ती पतीसोबत नाशिकला राहायलाही गेली. इकडे मात्र या तरुणाचे चित्त लागत नव्हते. शेवटी प्रेमापोटी त्यानेही नाशिक गाठले. तिथे तो मिळेल ते काम करु लागला. गावाचीच मुलगी आहे म्हणून तिच्या पतीशी ओळखही करून घेतली. ओळख वाढली नंतर तो त्यांच्याच घरी राहू आणि खाऊ लागला.
गेल्या तिन वर्षापासून तो त्यांच्याच घरी राहत होता. मात्र सहा महिन्यापूर्वी तिच्या पतीला या दोघांच्या वागणुकीवर शंका आली आणि त्यांच्या संसारात खटके उडायला लागले. शेवटी या प्रेमी युगूलाने पडून जाण्याचा निर्णय घेतला. त्या विवाहित मुलीने हिंमत दाखवून आपल्या सहा-सात वर्षाच्या मुलाला सोडून त्या युवकासोबत रफुचक्कर झाली. त्याने नाशिकमध्येच एक रुम करुन, तिला तिथे ठेवले. इकडे पत्नी गायब झाली म्हणून पतीने तिच्या आई-वडिलांना व नातेवाईकांना कळविले. नाशिक पोलिस स्थानकातही हरवल्याची (मिसिंग) दाखल करण्यात आली. पोलिसांसह सर्वच शोधाशोध करु लागले. विशेष म्हणजे आपल्यावर कोणी शंका घेऊ नये म्हणून, तिच्या पती आणि घरच्यांसोबतच तो तरुण देखील तिला शोधू लागला. शोध तपास कुठपर्यंत पोहचला याबाबत माहिती घेण्यासाठी तिचा पती नाशिक पोलिस स्थानकात काही दिवसांनी गेला असता, त्यांच्यासोबत हा तरुणही होता. पोलिसांनी त्याच्याबाबत सहज विचारणा केली, का हा कोण आहे? यावर तिच्या पतीने हा माझा शालक आहे, असे सांगितले. म्हणजे तुमचा सख्खा शालक आहे का? असे पोलिसांनी विचारणा केली असता, नाही माझ्या पत्नीच्या गावाचा आहे, असे सांगितले. पोलिसांनी या तरुणास संबंधीत घटनेबाबत विचारणा केली असता, पोलिसांच्या चौकशीत तो अडकला आणि पोलिसांना धागा सापडला. त्याला तत्काळ रिमांडमध्ये घेतले आणि पोलिसी खाक्या दाखविल्यावर तो तरुण पोपटासारखा बोलू लागला. त्याने कबूल केले की, मीच त्या तरुणीला नाशिक मध्ये च स्वतंत्र रुम करुन ठेवले आहे.
सदर रुमवरुन, पोलिसांनी त्या तरुणीस पोलिस स्थानकात आणले आणि दोघांच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले. त्याठिकाणीही त्या तरुणीचा पतीसोबत न राहता त्या तरुणासोबत राहणार असा आग्रह कायम होता. एकाच गावाचा प्रश्न असल्याने दोघे नातेवाईकांनी एकमेकांना समजूत घालुन ते प्रकरण तिथेच मिटवून घेतले. आणि त्या तरुणीस चौबारी माहेरी आणले. तो तरुण मात्र तिथेच नाशिकला थांबला.
मात्र या घटनेला आठ दिवसही होत नाही तो पर्यंत नाशिक हुन तो तरुण गायब झाला. आणि ती तरुणी आईच्या राहत्या घरुन चौबरी हुन ३० आॅगस्ट २०१८ रोजी रात्री १२ ते ०१ दरम्यान पुन्हा गायब झाली. त्यानंतर मारवड पोलिस स्थानकात हरवल्याची (मिसिंग) चा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून शोधाशोध सुरु आहे मात्र ती अद्याप ही आढळून आले नाहीत.
याबाबत अधिक तपास केला असता सदर चे जोडपे आॅनर किलिंगचे शिकार तर झाले नाही..? म्हणजेच या प्रेमाचा शेवट ही सैराटच्या शेवट सारखाच तर झाला नसेल.? अशी धिम्या-दबक्या आवाजात गावात कुजबूज सुरु असल्याचे खबरीलाल च्या गुप्तहेरांनी कळवले आहे.पुढील तपास मारवड पोलिस करीत आहे.