‘खाशि विसर्जन’चे विरोधकांकडून पिल्लू प्रयत्न करूनही सिधा होणार नाही उल्लू
आशीर्वादचे उमेदवार गुलाबराव पाटलांचा ‘खबरीलाल’शी बोलताना मोठा खुलासा
‘गुलाब’ नाम से फ्लावर समजे क्या, फ्लावर नही ‘कायदे’ के फायर है हम……!
अमळनेर (खबरीलाल विशेष) खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक टू बी कंटिन्यू सुरू झाली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असून विरोधक सहकार पॅनलकडून आशीर्वादचे विद्यामान संचालकांविरुद्ध खाशि विसर्जनाचा मुद्दा घेऊन मतदारांमध्ये पिल्लू सोडले आहे. त्यामुळे नेमका कायदा काय आहे, कायद्यात अशी कोणती तरतूद याची याबाबत आशीर्वादाचे उमेदवार तथा सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील यांच्याकडू खबरीलालने माहिती जाणून घेतली असता संस्था विसर्जनाचा अधिकार संचालकांना नव्हे तर संस्थेच्या तीन पंचाऊस सभासदांना आहे, असा मोठा खुलासा केला. त्यामुळे विरोधकांनी कितीही पिल्लू सोडले तरी त्यांचा उल्लू या निवडणूक सिधा होणार नाही. आणि सध्या गाजत असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील डॉयलॉग प्रमाणे ‘गुलाब’ नाम से फ्लावर समजे क्या, फ्लावर नही ‘कायदे’ के फायर है हम……! असा संसनित संदेशच जणू त्यांनी यानिमित्ताने दिला आहे.
खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यापासून विरोधकांकडून खाशि विसर्जन करण्याची टिमकी मतदारांमध्ये वाजवली जात आहे. त्यामुळे खरा प्रकार काय आहे, हे ‘खबरीरालाल’ने जाणून घेतले. आशीर्वाद पॅनलचे उमेदवार गुलाबराव पाटील हे सेवानिवृत्त न्यायाधीश असल्याने तेच यासंदर्भात स्पष्ट आणि कायदेशीर माहिती देऊ शकतात म्हणून त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, आपले कायद्याचे राज्य आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, आपण आतापर्यंत प्रत्येक गोष्टही कायद्याला धरूनच केली आहे. कायदा हा माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे बेकायदेशीर कोणतेही काम मी करीत नाही, आणि कोणी करीत असेल तर त्यांना तेथेच रोखले जाते. त्यामुळे मी कायद्याने चालणारा माणूस असल्याने उमेदवारी करीत असताना खाशि विसर्जनाचा मुद्दा पुढे आला. खरे पाहिले तर विरोधकांना कायद्याचे अपूर्ण ज्ञान असल्यानेच याचे भांडवल केले जात आहे.
संस्था विसर्जनासंदर्भात असा म्हणतो कायदा…
सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील म्हणाले, महाराष्ट्र संस्था नोंदणी अधिनयम १८६० च्या कलम १३ मध्ये संस्था विसर्जनची पद्धत सांगितली आहे. संस्था विसर्जित करायची असेल तर संस्थेचे जे एकूण सभासद आहेत. त्यांची सर्वसाधारण सभा बोलवण्यात येऊन हजर असलेल्यांच्या एकूण संस्थेच्या सभासदांपैकी तीन पंचमाऊस सभासद जेव्हा संस्था विसर्जित करावी, असे म्हणतील तेव्हाच ती विर्सजित होऊ शकते, अन्यथा ती बाब संचालकांच्या अख्त्यारितील नाही. त्यांना परस्पर विसर्जित करण्याचा कोणताही अधिकार नाही, जेव्हा सभासद एक मताने, एक मुखाने सांगतील. तेव्हाच संस्थेचे विसर्जन होऊ शकते. अन्यथा होऊ शकत नाही, अशी स्वयंस्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे खाशिचे मतदार याचा पुरेपूर विचार करतील आणि विरोधकानांच तोंडावर पाडतील, असा विश्वास आहे.
सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्टनुसारच ठराव
खाशिच्या विसर्जनाचा ठराव हा सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्टनुसारच करण्यात आला आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले, कारण विद्यामान संचालकांकडून माहिती घेतली असता सार्वजनिक देणगीतून सुट हवी असेल तर घटनेत संस्था विसर्जनाची तरतूद केली पाहिजे. त्यानुसार ती केली गेली आहे. याचा अर्थ ती विसर्जित केली गेली आहे, असे नाही. त्यामुळे विरोधकांकडून तद्दन खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. खाशिचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना कायदा आणि खरे, खोटे कळते. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत, याची खात्री आहे.
उमेदवारीची पूर्ण करणार इनिंग
गुलाबराव पाटील यांची पुणे येथे निवृत्तीनंतरही कराराने न्यायाधीशपदी निवड झाल्याने ते निवडणूक रिंगणातून बाहेर पडतील, उमेदवारी करण्यास कायदेशीर अडचण येईल, अशा चर्चेच्या फैरी झडत होत्या. त्यामुळे विरोधकांनां चांगल्याच गुदगुल्या होत होत्या. परंतु गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, न्यायाधीशपदी निवड झाली आहे. परंतु अद्याप पदभार स्वीकारला नसल्याने खाशिच्या निवडणुकीतील उमेदवारी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खाशिच्या निवडणुकीची इनिंग जोरदार खेळणार असल्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीचा प्रयत्न
श्रीमंत प्रताप शेठ यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ही संस्था उभी केली आहे. या संस्थेच्या नावाला एक वेगळे वलय आहे. म्हणून निवृत्तीनंतर या चांगल्या संस्थेशी जुळता येत असल्याने आपण उमेदवारी करीत आहोत. विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा देण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहिला आहे. कायद्यात राहून कसे फायद्यात असतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल. तसेच आताही गुणवत्तापूर्णच शिक्षण सुरू आहे. याच्याही पुढे जाऊन विद्यार्थ्यांची अधिक गुणवत्ता कशी वाढवता येईल, याचा नेहमी प्रयत्न असेल.