खबरीलाल – अमळनेर (प्रतिनिधी ) शहरात स्पंज प्रमाणे थर्माकोल दाबून परप्रांतीयांकडून गाद्यांची विक्री होत आहे. यामुळे नागरिकांची फसवणूक होत असल्याने नागरिकांनी व्यवस्थित पारखूनच गाद्या खरेदी कराव्यात.
अमळनेर शहरात गल्लीत स्पंजच्या गाद्या विक्रीच्या नावाने काही परप्रांतीय विक्रेते ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. सुमारे ३ हजार ते १०हजार पर्यंत गाद्यांची किंमत सांगितले जाते. मात्र या गाद्यामध्ये प्रत्यक्षात त्यात स्पंज नसून थर्माकोल आढळून येते. स्पंज प्रमाणे थर्माकोल दाबून ग्राहकांची फसवणूक करून त्यांना लुटले जात आहे. गाद्यात थर्माकोल असल्याचे लक्षात येईपर्यंत विक्रेते हे त्या भागातून निघून गेलेले असता. त्यामुळे नागरिकांना काहीही करता येत नाही. फसवणूक झाल्याचे कोणाला सांगता ही येत नाही आणि बिल नसल्याने पोलिसांकडे तक्रारही करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आधी पारखूनच अशा गाद्या विकत घेणे आवश्यक आहे.