खबरीलाल– अमळनेर (प्रतिनिधी ) गांधलीपुरात पारधीवाडा भागात विनाकारण शिवीगाळ का करतो म्हणून विचारायला गेलेल्या महिलेच्या मुलाला पोटात एकाने चाकू मारून पुतण्याला काठीने मारहाण केल्याची घटना २३ रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, दिनांक २३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता सुनील दिलीप पारधी हा गल्लीत तंबाखूची पुडी घ्यायला किराणा दुकानांवर गेला असता तेथे गोलू भरत पारधी विनाकारण शिवीगाळ करू लागला. त्याचा जाब विचारायला सुनीलची आई भारतीबाई पारधी व त्याचे भाऊ गेले असता गोलू याने तुम्ही मला विचारणारे कोण म्हणून चाकू काढून सुनीलच्या पोटात मारला. तर अमोल भरत पारधी याने सुनील व पुतण्या अजय यास काठीने मारहाण केली. तसेच खून करण्याची धमकी दिली. भारतीबाईच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.