
आमदार अनिल पाटलांच्या हस्ते रस्ता कामाचे झाले भूमिपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद ते दहिवद फाट्यापर्यंत एस.आर प्रोग्रॅम अंतर्गत ४० लाखांचा निधी मंजूर करून आमदार अनिल पाटील यांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळे या रस्त्याचे भाग्य उजळून नागरिकांची समस्या सुटल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
दहिवद हे तालुक्यातील मोठे गाव असून गेल्या चार ते पाच वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली होती. त्यामुळे येथून जाताना ग्रामस्थांची कसरत होत होती. आमदार अनिल पाटील यांनी निधी मंजूर करून आल्याने रस्त्याचे भाग्य उजाळले आहे. भूमिपूजन प्रसंगी सरपंच सुषमा देसले, ग्रामस्थांनी नवीन पाणीपुरवठा व रस्ता काँक्रीटीकरणाची मागणी केली, तर धनगर समाजाने स्मारकाची मागणी केली, ही सर्व कामे येत्या काळात पूर्ण करण्याची ग्वाही आमदारांनी दिली. या वेळी पंसचे माजी उपसभापती सुभाष देसले, माजी जिप सदस्य अशोक पाटील, जयवंत गुलाबराव पाटील, मार्केटचे प्रशासक सदस्य एलटी पाटील, उपसरपंच बाळू आत्माराम पाटील, माजी उपसरपंच सुनिल पाटील, ग्रांप सदस्य शिवाजी पारधी, वर्षा पाटील, रेखाबाई पाटील, रवींद्र माळी, दत्तात्रय देसले, गोकुळ माळी, किशोर पाटील, सुकलाल पारधी, बापू सोनवणे, भिला नाना, संजय देसले, ईसवर माळी, भूषण भदाणे, गुलाब पाटील बापू पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भानुदास लोहार, दिलीप माळी, भाऊराव पाटील, स्वप्निल पाटील, नरसिंह देसले, सुधाकर पाटील, आनंदा पाटील, राजेंद्र पारधी, भिकन सोनवणे, राहुल माळी, बाळू सोनार, नाना पाटील, पंडित पाटील यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.