राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अमळनेर तालुकाध्यक्षपदी सचिन वाघ यांची निवड

अमळनेर (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अमळनेर तालुकाध्यक्षपदी डांगर बु.येथील कार्यकर्ते सचिन निंबा वाघ यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील यांनी ही निवड केली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशान्वये तालुकाध्यक्षानी ही निवड केली आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील,जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,बाजार समिती मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील,कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, विधानसभा क्षेत्राप्रमुख भागवत पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,एल टी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील,गोविंदा बाविस्कर, राष्ट्रवादी युवक ता अध्यक्ष श्रीनाथ पाटील,शहराध्यक्ष सुनिल शिंपी,अनिरुद्ध शिसोदे,भूषण भदाणे,निनाद शिसोदे,शुभम बोरसे आदींनी स्वागत केले आहे. दरम्यान आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांचे जाळे उभारून पक्षाचे ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम सोशल मीडिया विभागातर्फे करण्यात येणार असल्याचे सचिन वाघ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *