
अमळनेर(प्रतिनिधी) विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतर महाविद्यालय जुदो स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाने पुरूष आणि महिला अशा दोन्ही गटात विजेतेपद पटकावले.
प्रताप महाविद्यालयाच्या ईनडोर हॉलमध्ये या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत अमळनेर, धरणगाव ,चाळीसगाव , जळगाव, एरंडोल, परोळा ,पाचोरा या सात महाविद्यालयाचे संघ सहभी झाले होते. प्रताप महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.जे. बी.पटवर्धन यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. या प्रसंगी प्रमुख अथिती रतन लिंगाटे (शिव छत्रपती पुरस्कार विजेते),क्रीडा संचालक शैलेश पाटील (सचिव), क्रीडा संचालक देवदत्त पाटील, दिपक पाटील, डॉ. विजय तुंटे (जिमखाना प्रमुख), विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप नेरकर, तत्वज्ञान व मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा.माधव भुसनर, वरिष्ठ क्रीडा संचालक सचिन पाटील हे उपस्थित होते. या स्पर्धे करिता पंच म्हणून भानुदास आर्खे (कुस्ती पंच ) सचिन वाघ (मुख्य पंच), यद्नेश जगताप (पंच ) ,यश राजे (पंच,मुंबई ) यांनी काम पाहिले. तर क्रीडा संचालक सचिन पाटील, बाळू देवकाते यांनी स्पर्धेच्या यशासाठी विशेष असे परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल
मुले- प्रथम -प्रताप महाविद्यालय, द्वितीय-अभियांत्रिकी महाविद्यालय ( जळगाव) , तृतीय- दि.श. पाटील महाविद्यालय, (एरंडोल). मुली- प्रथम- प्रताप कॉलेज (अमळनेर) द्वितीय दि.श.पाटील (एरंडोल), तृतीय-पाचोरा महाविद्यालय.