दुकानदारावरील हल्लाप्रकरणी तिघांना  सुनावली न्यायालयीन कोठडी

अमळनेर (प्रतिनिधी) किराणा दुकानदाराच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून हाताचे बोट चाकून कापणाऱ्या तिन्ही मद्यपी आरोपींना अटक करून न्यायालसमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
 याबबात अधिक माहिती अशी की, रवींद्र गोविंदराम सैनानी यांच्या गांधलीपुरा भागातील किराणा दुकानांवर पैलाड येथील रोशन राजेंद्र पाटील , यशवंत प्रकाश पाटील , विजय राजेंद्र पाटील हे तिघे दारू पिऊन दुकानात आले. त्यांच्या हातात बियरची बाटली होती. त्यांनी पाण्याची बाटली , कुरकुरे व सिगारेट घेतली. त्याचे मालक रवींद्रने पैसे मागितले. त्याचा राग येऊन तिघांनी रविंद्रच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्याच्या बोटाचे पेरूनही चाकून कापले होते. याप्रकरणी दि. १३ रोजी तीनही आरोपींना १ वाजेदरम्यान पोलिसांनी अटक करून न्यायालायासमोर हजर केले असता त्यांना  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून आरोपींची जिल्हा कारागृात रवानगी करण्यात आली.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *