अमळनेर (प्रतिनिधी) खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य आणि सांस्कृतिक कला क्रीडा मंचतर्फे २५ व २६ डिसेंबर असा दोन दिवसीय खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे.
या महोत्सवामध्ये जागर अहिराणी मायना, खान्देशी कवींची काव्य मैफिल, खान्देशी ऑर्केष्ट्रा, होम मिनिस्टर आणि खान्देशी सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासोबतच शांताबाई फेम अभिनेत्री राधिका पाटील यांचा खान्देशी रंगारंग कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष शीतल सावंत व शहर संघटक अॅड. मीनाक्षी साळुंखे यांनी दिली.