अफवांवर विश्वास ठेवून लसीकरण करून घेण्यासाठी होतेय टाळाटाळ

बोगस लसीकरणावर थेट आहे नजर, जिल्हाधिकाऱ्यांकडेही पोहचेल खबर


अमळनेर (प्रतिनिधी) अजूनही शहरात अफवांवर विश्वास ठेवून मुस्लिम बहुल वस्तीत लसीकरणाचा टक्का घसरलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता संसर्ग झाल्यास एक वरून शंभरावर कोरोना रुग्ण वाढण्यास वेळ लागणार नाही. यासाठी समाजातील जागृत नागरिकांनी पुढाकार घेत लसीकरणाच टक्का वाढवण्याची गरज आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शंभरटक्के लसीकरण होणे गरजे आहेत. परंतु अजूनही लसीसंदर्भात समज गैरसमज आणि अफवा असल्यामुळे अनेकजण पुढे येत नाही. त्यात मुस्लीमबहुल वस्तीत याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अनेकजण अफवांवर विश्वास ठेवून लस घेण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे एकून सहरातील लसीकरणाचा टक्का कमी आहे. विशेष म्हणजे कोरोना कोणतीही जात, धर्म, पंत पाहत नाही. अनेक जण कोरोना कुचभी नही, झुट है सब, असे म्हणत लसीकरण करण्यास विरोध करीत आहेत. परंतु  असे म्हणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागन झाली. त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. कुटुंबात अशा माणसांची मोठी पोकळी निर्माण झाली. लस न घेणाऱ्यांनी अशा कुटुंबाना जाऊन विचारले तर त्यांन कोरोना काय असतो, हे निश्चितच कळेल. म्हणून केवळ अफवांवर विश्वास ठेवून आपल्यासह आपल्या कटुंबाचा आणि पर्यायाने आपल्या परिसराचा शहराचा जीव धोक्यात टाकण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. म्हणून लसीकरणासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रजिस्ट्रेशन करून लस न घेण्याचा खबरीलाल हाणून पाडेल कुटील डाव

लसीकरणाविषयी अनेकांमध्ये गैरसमज आहेत. तर दुसरीकडे यंत्रणा लसीकरणाचे उदिष्ट्ये गाठण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. असे असतानाही काही महाभाग अजूनही लसीकरणासाठी पुढे येत नाही. काही आले तर ते केंद्रावर जाऊन डोस न घेता नुसती रजिस्ट्रेशन करून घेत आहेत. यामुळे यंत्रणेचे उद्दिष्ट्ये साध्य होत असले तरी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता हे अत्यंच चुकीचे आहे. त्यामुळे अशा राष्ट्रीय कार्यात बेईमानी करणाऱ्या यंत्रणेवर खबरीलालचे बारीक लक्ष असून यासंदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत तक्रार केली जाईल. म्हणून यंत्रणेनेही रजिस्ट्रेशन केल्यावर त्या व्यक्तीला डोस देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना चुकीच्या पद्धतीने लसीकरणाची आकडेवारी फुगवण्याच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *