माणूस केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य, समता व बंधुता तत्त्वांवर लोकशाहीची निर्मिती

पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत गंगाधर बनबरे यांचे प्रतिपादन

अमळनेर(प्रतिनिधी) “संपूर्ण जगात स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित लोकशाही ही माणूस केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली आहे, म्हणून आपल्या प्रत्येक विचाराच्या केंद्रस्थानी कुठलीही अमूर्त संकल्पना न ठेवता माणूस ठेवून विचार केला तरच विचारात आणि समाजात परिवर्तन शक्य आहे”, असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत गंगाधर बनबरे यांनी केले.
अमळनेर येथे राष्ट्रविचार प्रबोधन कार्यक्रमांतर्गत शांताराम पाटील स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. बनबरे म्हणाले,  अवघाची संसार सुखे करा हा विचार व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राचा विकास करेल प्रसंगी कर्ज घ्या स्वतःचा विकास साधा,ते फेडण्याचा, प्रयत्न करा मात्र जीवन संपवू नक,असा सल्ला दिला. यावेळी मंचावर प्रा.शिवाजीराव पाटील, प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत, प्रा.लिलाधर पाटील, रणजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रविचार प्रबोधन कार्यक्रमांतर्गत शांताराम पाटील स्मृती व्याख्यानमालेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव पाटील यांनी ‘बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा मानव केंद्रित विचार असून तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार यांची सांगड घालण्यात समृद्धपणे कसे जगता येईल. कालानुरूप आपल्या विचारात बदल करून अधिकाधिक तार्किक आणि विज्ञानवादी होत जाणे यातूनच समाज उन्नत होईल स्वतःच्या प्रगतीसाठी प्रचंड कष्ट करा व समाजाशी असलेली नाळ कधीही तोडू नका! असा सल्ला उपस्थितांना दिला.  याप्रसंगी शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख परिषदेतर्फे महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. लीलाधर पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी जळगांव येथील मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष राम पवार, पाडळसरे धरण समितीचे सुभाष चौधरी,  संदिप घोरपडे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.सुभाष पाटील, मराठा सेवा संघाचे कैलास पाटील, नगरसेवक श्याम पाटील, अशोक पाटील, प्रा. राहुल निकम, पीडिएसपीचे विलास पाटील, अरुण देशमुख, पू. सानेगुरुजी ग्रंथालयाचे दिलीप सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, छाया सोनवणे, वाल्मिक पाटील, भास्कर बोरसे, सेवा निवृत्त एस. डी. देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केले. आभार बन्सीलाल भागवत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *