खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दहिवद येथे माझी बिहार पटर्न वृक्षलागवड आणि विकास कामांची नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली पाहणी

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील दहिवद येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बिहार पटर्न लावलेल्या वृक्षलागवड अटल घन वन मियावाँकी व विकास कामांची नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , मनरेगा सहाय्यक आयुक्त नाकाडे यांनी भेट देऊन पाहणी केली.
आयुक्त गमे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचा सरपंच सुषमा वासुदेव पाटील व उपसरपंच बाळू पाटील यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावर्षी लावलेल्या वृक्षलागवड व अटल घनवन (मियावाँकी) ची पाहणी केली. कामाचा बाबतीत समाधान व्यक्त करण्यात आले.यावेळी संपूर्ण कामांचा व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चाललेल्या कामांची माहिती व कामांचा आढावा घेण्यात आला.महसूल विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा उतारा वाटप करण्यात आले. यावेळी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे , तहसीलदार मिलिंद वाघ , गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी ,तालुका वैद्यकीय अधिकारी गोसावी,विस्तार अधिकारी चिंचारे ,विस्तार अधिकारी अनिल राणे, जि. प बांधकाम इजिनीयर दिपक बोरसे, पापु इजिनियर नांद्रे, माजी उपसभापती प स सुभाष देसले, दहिवद विकास मंचचे गोकुळ माळी, किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, शिवाजी पारधी, रवींद्र माळी, वर्षा पाटील, आशाबाई माळी, मालुबाई माळी, वैशाली माळी, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे तलाठी महेंद्र पाटील, ठाकरे, तांत्रिक अधिकारी धिरज पाटील,बचत गटचे सीमा रगडे, पाणी फाउंडेशनचे सुनील पाटील, सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, रोजगार सेवक भागवत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, जयश्री पाटील, गावातील म गा रोजगार हमी योजनेचे महिला मजूर, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button