अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ मंडळासह ३२ गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे सानुग्रह अनुदानाचा प्रश्न २४ महिने उलटूनही मिळाले नाही. म्हणून मारवड मंडळासह वंचित शेतकरी आमदार अनिल पाटील यांच्या निवास्थानासमोर साखळी उपोषण करणार आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले. जुलै व सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टित मारवड मंडळासह तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला. मात्र अजूनही उर्वरित ३२ गावे वंचित आहेत. १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर रोजी तीन दिवस वंचित शेतकरी सकाळी ११ ते १२ या दरम्यान साखळी उपोषण करतील. यावेळी नायब तहसीलदार पवार यांना निवेदन देतांना मारवड परिसरातील शेतकरी श्यामकांत पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मधुकर पाटील, शरद साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील ,अमोल पाटील बाबा सुर्वे ,भगवान पाटील, संदीप पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.