अमळनेर (प्रतिनिधी) पोलिस ठाण्यातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शांतता समितीची आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जी.एस. हायस्कूल स्वामी समर्थ मंदिराजवळ ही बैठक होईल.
या वेळी पोलिस अधिकारी, आमदार अनिल पाटील, सर्व नगरसेवक , राजकीय पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरीक उपस्थिती राहणार आहे. कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यस्थेच्या अनुषगांने उपाय योजनांसह तसेच मुख्याधिकारी यांनी मुख्य रस्त्यावरील डागडुजी तसेच मूर्ती संकलन, वाहन व्यवस्था व कृत्रिम तलावाच्या संदर्भातलील बाबतच्या उपाययोजनासह, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालय, नगरपरीषद रूग्णालय यांनी कोरोना संसर्ग- तिसरी लाटच्या अनुषगांने उपाययोजनासह तसेच वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी गणेश उत्सव काळात लोड शेडींग , शहरातील व ग्रामीण भागातील लोंबकणाऱ्या विद्युत तारा संदर्भातील उपाययोजनासह व गट विकास अधिकारी यांनी ग्रामीण भागातील गणेश मूर्ती स्थापना तसेच विसर्जन बाबत केलेल्या उपाययोजनासह चर्चा / आढावा बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.