अमळनेरची जीवनवाहीनी बोरीमाईला साडीचोळी अर्पण करून भरली ओटी

बारमाही जलमय राहण्यासाठी  महिलांनी बोरीमाईला घातले साकडे

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातून जाणाऱ्या बोरी नदी जलमय झाल्याने अमळनेर येथील महिला भगिनींनी एकादशीच्या दिवशी नदीकाठावर जाऊन बोरी नदीला साडीचोळी अर्पण करत आरती करून ओटी भरली. आमच्या बोरी माईला बाराही महिने असेच जलमय राहो आणि बळीराजासह प्रजेचे कल्याण होवो अशी सामूहिक आराधना महिला भगिनींनी पर्जन्यदेवतेसह विठू माऊलीकडे केली.
प्रती पंढरपूर असलेल्या अमळनेरातून बोरी नदी वाहते. यंदाही ती पूर्णपणे दुथडी भरून वाहत असल्याने ती अशीच वाहत राहो म्हणून तिला साडीचोळी अर्पण करण्यात आली. यावेळी उज्वला शिरोडे, अनिता जामखेडकर, अर्चना वर्मा, सरला चौधरी, कल्पना शिरोडे, रुपाली संगीले यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. महिला भगिनींच्या या उपक्रमात बच्चे कंपनी देखील सहभागी होऊन सामुहिक आरती करण्यात आली.

जीवनदायी ठरणारी बोरी माई

दरम्यान पूर्वीच्या काळी बोरी नदी वर्ष भर वाहत होती. विशेष म्हणजे अमळनेर शहराची पाणीपुरवठा योजना देखील बोरी नदीवरूनच होती. बोरी काठावरील अनेक गावे देखोल याच नदीवर अवलंबून होते. मात्र काळाच्या ओघात नदीचा सततचा प्रवाह थांबून काही वर्षांपासून उन्हाळ्यात देखील नदीला पाणी येत नव्हते. परंतु दोन वर्षांपासून पावसाळा का असेना बोरी नदी प्रवाहित होत असल्याने बळीराजासह जनता समाधानी आहे,अशा या जीवनदायी ठरणाऱ्या बोरी माईची महिलांनी साडीचोडीने ओटी भरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *