अमळनेर (प्रतिनिधी) मृदुंग टाळ विनाच्या गजरात ओम नमो शिवाय आणि गण गण गणात बोतेचा जय घोष करीत संत सखाराम नगरी अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर निम येथे श्री साई गजानन मंडळाची पायीवारी भाविकांच्या उत्साहाने पार पाडली.
श्री साई गजानन सेवा मंडळ संचलित पायीवारी सोमवारी सकाळी ५.३० वाजता मोठेबाबा मंदिरात महाआरती होऊन मार्गस्त झाली होती. पालखीत माऊली गजानच्या पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या होत्या. रस्त्याने धार-मारवड-कळमसरे, निम गावी वारकऱ्यांचे सडा रंगोळ्या कडून ढोल-ताश्यांच्या वाद्यात स्वागत करण्यात आले. विणेकरी विश्राम महाराज पुढे चालत होते. कपिलेश्वर वेशीवर ट्रस्टचे सी. एस. पाटील, एस. एम. पाटील, हभप भगवान महाराज, सनी महाराज, इसे व महिलांनी ओम नमो शिवायचा जयघोष करत वारी कपिलेश्वर मंदिरात आणली. ट्रस्टतर्फे श्री साई गजानन मंडळाचे गुणवंत पवार, एस. डी. सोनवणे, विठ्ठल पाटील, शिरीष डहाळे, सुभाष साळुंखे, गुलाब पाटील ,नामदेव पाटील, तुळशीराम पाटील, वाल्मिक पाटील, ईश्वर पाटील, ए. टी. पाटील, अशोक इसे, जे. बी. पाटील, रघुनाथ पाटील, विश्राम महाराज, राजेंद्र पाटील, गणेश बोढरे, राजेंद्र पाटील, डी. ई. पाटील, आर. व्ही. पाटील, समाधान पाटील, वारकऱ्यांसह महिलांचा देखील श्री महामंडलेश्वर हंसानंदजी यांचे हस्ते श्रीफळ व महाप्रसाद दिले. या वारी यशस्वितेसाठी पांडुरंग सावंत, चंद्रशेखर व्यास यांनी सहकार्य केले.