हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायततर्फे ६०० रोपांची केली लागवड

जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील आणि सरपंच राजश्री पाटलांच्या उपस्थितीत कार्यक्रम

 

अमळनेर(प्रतिनिधी) बिहार पॅटर्नच्या माध्यमातून तालुक्यातील हिंगोणे खु.प्र.ज. ग्रामपंचायतीतर्फे ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. जि.प.सदस्या जयश्री पाटील व सरपंच राजश्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. यामुळे भविष्यात या परिसरात हिरवळ निर्माण होणार आहे.
अमळनेर तालुक्यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता वृक्षारोपण चळवळ मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. हिंगोणे येथे वृक्षारोपणप्रसंगी माजी सरपंच प्रवीण दगाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य किरण कोळी, संजय प्रभाकर पाटील, प्रकाश शामराव कोळी, नथू नामदेव कोळी, बारकू बुधा कोळी, सुरेश रामसिंग कोळी, वासुदेव दगडू भिल, आधार आकसू भिल, पदम सजन बैसाने, सचिन आनंदा कोळी, छोटू कोळी, बबलू पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *