राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमळनेरचा सारांश सोनार ठरला प्रथम विजेता

मुंबई येथील अमर हिंद मंडळाच्या कै. उमेश शेनॉय स्मृतीनिमित्ताने अमृतमहोत्सवी स्पर्धा

अमळनेर (प्रतिनिधी) मुंबई येथील अमर हिंद मंडळाच्या कै. उमेश शेनॉय स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत हिमालय वितळतोय, नद्या आटताहेत’ या विषयावर लक्षवेधी मांडणी करत सारांश धनंजय सोनार हा प्रथम क्रमांकाने विजेता ठरला. विशेष म्हणजे तो स्पर्धेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा विजेता ठरला. तर व्दितीय क्रमांक सातारा येथील सुजित कालंगे यांनी पटकावला.
अर्थतज्ज्ञ प्रा. विनायक कुलकर्णी, प्रा. राधिका इंगळे, सीए अजित जोशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. संस्थेचे रवींद्र ढवळे, सीमा कोल्हटकर या मान्यवरांच्या हस्ते रोख ७००० व सन्मानचिन्ह देऊन सारांश सोनाराल गौरवण्यात आले. सोनार यांचे प्राचार्या ज्योती राणे, प्रा. नितीन पाटील, डिगंबर महाले, प्रा. डॉ. संदीप नेरकर, प्रा. पराग पाटील, डॉ. जि. एम. पाटील, सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, निबंधक इंद्रवदन सोनवणे, प्रा. डॉ. रमेश माने, उपप्राचार्य उल्हास मोरे, प्राचार्य विजय बहीरम, प्रा. वैभव सबनीस, सचिन खंडारे, रवींद्र विसपुते, शाम सोनार, लिलाचंद विसपुते, पत्रकार संजय सोनार, गणेश खरोटे यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *