अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील ताडेपुरा, शनिपेठ, शांताबाईनगर, मिळचाल परिसरातील नप शाळा येथे श्रीमती भानुबेन गोशाळे च्या सहकार्याने मुलांना शैक्षणिक साहित्यासह दप्तर सामाजिक कार्यकर्त्यांनी वाटप केले.
सेवाभावी उपक्रमाचे प्रमुख संयोजक प्रा. अशोक पवार अध्यक्षस्थानी होते. बन्सीलाल भागवत आणि गौतम मोरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगर पालिका शिक्षण मंडळाचे सुनील पाटील,सत्तार भाया , हमीद गुरुजी,विक्रम पाटील, सुनिल शिंपी,श्रीनाथ पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यतीन पवार,सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजित शिंदे,शुभम बोरसे,शिक्षक धर्मा धनगर, परशुराम गांगुर्डे, आदिंनी सहकार्य केले.न पा शाळेच्या मुख्याध्यापिका भारती पाटील, शिक्षक रवी पाटील यांनी परिश्रम घेतले. श्रीमती भानुबेन शाह गोशाळेचे सचिव चेतनभाई शाह यांच्या माध्यमातून जनकल्याण ग्रुपचे कमलेश भाई,सेवा सौभाग्य ट्रस्टचे नवणीतभाई गाला,श्री अरीहंत कृपा फाऊंडेशनचे जुलेश भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई येथून शेकडो गरजू विद्यार्थ्यांसाठी दप्तर व शैक्षणिक साहित्य पाठविले होत.