अमळनेर (प्रतिनिधी) पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी रुपये ५१ हजार आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी नगर परिषदेतर्फे २१ हजाराचा धनादेश मुख्यमंत्री साय्यता निधीसाठी दिले.
राज्यात पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये योगदान देवून सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. म्हणून २७ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा आवाहनास पतिसाद देत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी मदत दिली. प्रांताधिकारी सीमा आहिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संजय चौधरी, विक्रांत पाटील, संदिप गायकवाड,. संजय पाटील, डॉ . राजेंद्र पिंगळे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.