वावडे येथील एकाविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथे वीजबिल थकल्याने मीटर काढून नेत असताना वीज कंपनीच्या पथकाच्या गाडीची चावी काढून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील वावडे येथे सहायक वीज अभियंता विजय गुर्जर हे पथकासह थकीत विज बिल वसुली व कार्यवाहीसाठी फुलसिंग मोतिराम भिल यांचे बील थकल्याने मिटर जप्त करून जात होते. या वेळी रमेश देविदास मालचे (रा.भरवस) हा आला. त्याने आम्ही ए/सी सरकार आहे. महाराष्ट्र सरकार मानत नाही, भारत सरकारचा आदेश दाखवा, असे बोलून गाडीची चावी काढून घेतली व अटकाव करून ॲट्रोसिटी व चोरीचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ साळुंखे करीत आहेत.