उत्तर महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी लवकरच जनआंदोलन

उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांच्या बैठकीत निर्णय

पाडळसरे धरणाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) खान्देशातील सिंचन प्रश्न सोडवतांना तापी नदीवरील पाडळसरे धरणाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीचा उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेच्या अजेंड्यात इतर मागण्यांसह समावेश करण्यात आला तर राज्य व केंद्र शासनाचे उत्तर महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी लवकरच जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे उत्तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांच्या जलचिंतन बैठकीत ठरविण्यात आले.
जलचिंतन बैठकीत पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रणेते सुभाष चौधरी,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी पाडळसरे धरणाबाबत सविस्तर माहिती उत्तर महाराष्ट्रातील उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधीसमोर यावेळी मांडली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासनाने गावंजवळून जाणाऱ्या सर्व नद्या नांगरून काढाव्यात या मागणीसह पुढील आंदोलनासाठी मार्गदर्शक सूचना यावेळी मांडल्या. जलपरिषदेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष नरेंद्र पाटिल यांनी जळगांव जिल्ह्यातील पाणी प्रश्न व अपूर्ण प्रकल्पांबाबत माहिती दिली.जिल्ह्यात जनजागृती करण्याबाबत सांगितले. यावेळी अमळनेर येथील धरण समितीचे कार्यकर्ते प्रा.सुनिल पाटिल हे उपस्थित जल चिंतन बैठकीत उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटिल यांनी खान्देशच्या वाट्याचे पाणी गुजरातला वाहून जात असल्याने पाणी प्रश्नावर भावी आंदोलनाची भूमिका जाहिर केली.तर कार्याध्यक्ष बापू हटकर यांनी मुंबईच्या धर्तीवर गुजरात मध्ये नविन सिटी वसवण्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या वाटायचे पाणी पळविले जात असल्याने जनआंदोलन आवश्यक असल्याचे सांगितले. वांजुळ जल संघर्ष समितीचे मालेगांव येथील प्रा. के. एन. अहिरे यांनीही वांजूंळ योजनेबाबत माहिती दिली. नाशिक जिल्हा परिषदेचे मा उपाध्यक्ष विश्वास देवरे यांनी नार पार सह विविध पाणी प्रकल्पांबाबत बैठकीत माहिती दिली.शहादा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटिल,ऍड निकम,डॉ एच एम पाटिल ,ए. जी. पाटिल आदिंनीहि पाणी प्रश्नावर केलेल्या कामाबाबत माहिती दिली.दिपक पाटिल,देवा पाटिल,गोरख माळी, हरचंद चौधरी,लिलाधर सोनार, बाळासाहेब ह्याळीज आदिंसह अनेक कार्यकर्त्यांनी सदर जलचिंतन बैठकीत सहभाग नोंदविला. खान्देशात सिंचन वाढावे,खान्देशातील शेती ओलिताखाली यावी यासाठी लोकप्रतिनिधी, राज्य व केंद्र शासनावर जनतेचा दबाव निर्माण करण्याच्या या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रात प्रबोधन व लोकजागृती कार्यक्रम परिषदेतर्फे राबविण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *