अमळनेर (प्रतिनिधी) घरात अवैध गुटखाचा साठा करून विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी टाकून एकाला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून सुमारे दीड लाखाचा गुटखा जप्त केला आहे. शनिपेठ भागात पोलिसांनी हा छापा टाकला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पैलाड शनिपेठ भागात एका घरात बेकाया गुटखा ,तंबाखू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, महिला कॉन्स्टेबल नम्रता जरे याना पाठवून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथक गेले असता संजय जगन्नाथ पाटील त्याच्या घरात गुटखा साठवून विक्री करीत असल्याचे आढळून आले. आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध मानवी आरोग्यास अपायकारक , मूर्च्छा व नशा येणारे अन्न पदार्थ विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.
पोलिसांनी घरातून असा केला गुटखा जप्त
पोलिसांनी घरातून ६२ हजार ६४५ रुपयांची ३३५ विमल ची पाकिटे , ११ हजार ५५ रुपयांची ३३५ विमल जर्दाची पाकिटे ,५४ हजार रुपयांची सागर पान मसाल्याची ४५० पाकिटे, १३ हजार ५०० रुपयांची सुगंधित तंबाखूची ७५० पाकिटे, ५ हजार २०० रुपयांची २६ पाकिटे मिराज असा एकूण १ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला.