अमळनेर (प्रतिनिधी ) घरासमोर लावलेली दुचाकी चोरटय़ाने चोरून नेल्याची घटना शहरातील गुरवगल्ली भागात घडली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गुरवगल्ली भागातील पंढरीनाथ ओंकार भावसार यांची दुचाकी (क्रमांक एम एच १९ , बी के ३०३८) ही अज्ञात चोरट्याने २३ रोजी रात्री घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल दीपक पाटील करीत आहेत.