६४१ चाचण्यांपैकी केवळ ५ रुग्ण आढळले पॉझिटिव्ह
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीमुळे खालावली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ टक्क्यांपेक्ष खाली येऊन मृत्यूदरही रोखण्यास प्रशासनाला यश येत आहे. शहरात गुरुवारी ६४१ चाचण्यांपैकी केवळ ५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे ही दिलासादायकबाब आहे.
अमळनेर तालुक्यात दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढताच प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तात्काळ उपायोजना करण्यास सुरुवात केली. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकसहभागातून इंदिराभूवन येथे ७० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर सुरू केले होते. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केयर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या घटू लागली आहे. गुरुवारी ग्रामीण भागात २४७ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात केवळ ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच शहरात ३९४ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. एकूण ६४१ चाचण्यांमध्ये केवळ ५ रुग्ण बाधित आढले. तर बाधितांची टक्केवारी १ टक्क्यांवर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
कोविड केअरसेंटर बंद
आता शासकीय रुग्णालयात फक्त १८ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे इंदिराभुवन मधील कोविड केयर सेंटर सोमवारपासून बंद करण्यात आले तर गुरुवारपासून आंबेडकर वसतिगृहातील कोविड केयर सेंटर बंद करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका ,कर्मचारी यांचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार असून जास्त लस उपलब्ध झाल्यास अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात येईल, असे अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे यांनी सांगितले