दहिवद येथील खंडेराव मंदिर देवस्थान परिसराचा तिर्थक्षेत्र आणि पर्यटन म्हणून विकास साधणार

खासदार उन्मेष पाटील यांनी खंडेराव महाराज देवस्थान यात्रेस भेट ग्रामस्थांना दिले आश्वासन

अमळनेर (प्रतिनिधी) दहिवद येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले  खंडेराव मंदिर देवस्थान परिसराचा तिर्थक्षेत्र व पर्यटनविकास निधीचा प्रस्ताव तयार करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
खासदार पाटील यांनी दहिवद ता. अमळनेर येथील खंडेराव महाराज देवस्थान यात्रेस भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. यात्रेनिमित्त बारागाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात या बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी मोठी यात्रा भरली होती.  सायंकाळी  खासदार पाटील यांनी या यात्रेस भेट देत भविकांशी संवाद साधला व जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुरुवातीला दहिवदच्या लोकनियुक्त सरपंच सुषमाताई  पाटील, पोलीस निरीक्षक वासुदेव पाटील  यांनी खासदार उन्मेश पाटील यांचे सपत्नीक सत्कार केला. खासदार उन्मेश पाटील यांचे दहिवद हे गाव सासुरवाडी असल्याने गावाच्या वेशीवर त्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील ,झुलाल पाटील, माजी जी.प.सदस्य  ए. टी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य  बाळू पाटील, सुनील पाटील, प्रताप  माळी, राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, माजी सरपंच जयवंत पाटील, प्रा. उमेश पाटील , स्वप्नील सोनवणे, चंद्रकांत भदाणे, शामकांत भदाणे, भूषण भदाणे, रणजित पाटील, चाळीसगाव पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, जामद्याचे माजी सरपंच रबी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

खंडेराव मंदिर टेकडीचे सुशोभीकरण करून पाणी, प्रसाधन गृहे, पेव्हर ब्लॉक बसविणार

परिसराचे आराध्य दैवत असलेला  खंडेराव मंदिर परिसराच्या  आजुबाजुला टेकडी असून हा परिसराचे सुशोभीकरण करून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधन गृहे,मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक अश्या  विविध सोयीसुविधा या प्रस्तावात समाविष्ट असून तिर्थक्षेत्रे व पर्यटनविकास निधीतून या मंदिराचा कायापालट केला जाणार आहे. मंदिराचे पुजारी तथा भगत हिंमत आहिरे यांनी खासदारांचे महाप्रसाद देऊन स्वागत केले.

“हर घर जल हर घर नल” योजनेतून दहिवद गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा

दहिवद पाणी पुरवठा योजना अडगळीत असून त्यासाठी केंद्राच्या “हर घर जल हर घर नल” या योजनेतून ही पाणी पुरवठा समस्या मार्गी लावली जाईल. याचा फायदा दहिवदसह दहिवद खुर्द ,सोनखेडी, निमझरी, नगाव खुर्द,नगाव बुद्रुक , देवळी, देवगाव,कु-हे खुर्द, कु-हे बुद्रुक, टाकरखेडा, कंडारी, म्हसले, लोणे या गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. यासाठी या पाणीपुरवठा योजनेसाठी भक्कम पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधतांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *