माजी आमदार साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी घेतली लस

अमळनेर(प्रतिनिधी) कोरोना लसीकरणात ६० वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. याचाच भाग म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी इंदिरा भवन येथील लसीकरण केंद्रात लसीकरण करून घेतले. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे,  बाबू साळुंखे,माजी नगरसेवक विक्रांत पाटील,रविंद्र पाटील,संजय चौधरी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *