अमळनेर (प्रतिनिधी) घराचा कडीकोंडा तोडून चोरटय़ांनी २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील ढेकू रोड भागातील मंदोधरा बाई देशमुख नगर भागात घडली. दागिने व रोख रकम अशा ऐवजचा समावेश आहे. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांनी देवघरातील चांदीचे नाणे ही लुटून नेले.
याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की. अमळनेर शहरातील ढेकू रोड भागातील मंदोधरा बाई देशमुख नगर मधील रहिवाशी वैशाली सचिन पाटील या भरवस येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद असल्याची संधी हेरून चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत देवघरातील १० हजार रुपये किमतीचे चांदी चे दागिने व १३ हाजर रुपये रोख असा २३ हाजार चा ऐवज लंपास केला आहे, घटनास्थळी पोलिसांनी भेट देत पाहणी केली. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.